महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे की दहावीचा निकाल उद्या, मंगळवार (ता. 13 मे) रोजी दुपारी 1 वाजता घोषित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची घोषणा असून निकाल पाहण्यासाठी विविध अधिकृत वेबसाइट्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल? विद्यार्थी आणि पालक ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून सहज निकाल पाहू शकतात. यासाठी खालील अधिकृत वेबसाइट्सवर भेट देऊ शकता: www.mahahsscboard.in www.mahresult.nic.in www.msbshse.co.in www.mh-ssc.ac.in www.sscboardpune.in निकाल पाहण्याची पद्धत: वरीलपैकी कोणत्याही वेबसाइटवर जा. 1. तुमचा सीट नंबर टाका. 2. तुमच्या आईचे नाव भरा. 3. निकाल स्क्रीनवर दिसेल आणि तुम्ही तो डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता. विद्यार्थ्यांनी निकाल पाहताना अचूक माहिती भरावी आणि अधिकृत वेबसाइट्सवरच विश्वास ठेवावा, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सर्व शासकीय, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २ मे २०२५ पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने २९ एप्रिल रोजी जारी केलेल्या पत्रकानुसार, नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ला १६ जून २०२५ पासून सुरुवात होणार आहे. राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व शाळांना सुट्टी आणि नवीन वर्षाच्या आरंभासाठी एकसंध वेळापत्रक आखण्यात आले आहे. इतर शिक्षण मंडळांतील शाळांनीही १६ जूनपासूनच अध्यापन सुरू करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. महत्त्वाचे मुद्दे: 1. विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टी २ मे २०२५ पासून लागू होईल. 2. इतर मंडळांतर्गत शाळा परीक्षा किंवा अन्य कारणांमुळे वेगळी वेळापत्रक ठेवू शकतात, मात्र त्यासाठी स्थानिक प्रशासनाची मान्यता आवश्यक आहे. 3. नवीन शैक्षणिक वर्ष १६ जून २०२५ पासून सुरू होईल. 4. जून महिन्यातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेता, २३ ते २८ जून या कालावधीत शाळा सकाळी ७.०० ते ११.४५ पर्यंतच भरवाव्यात. ३० जून २०२५ पासून शाळा नियमित वेळेनुसार सुरू होतील. शाळांनी या वेळापत्रकाचे पालन करावे व विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्य...